न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- जनावरं वाहतूकीचा कोणताही परवाना नसताना गोवंश जातीची गाय अत्यंत निर्दयतेने दोरीने बांधली. अशोक लिलँड कंपनीच्या दोस्त टेम्पोत (एमएच १४ सीपी ८०७२) टाकुन चा-याची व पाण्याची सोय न करता कत्तलीसाठी विक्री करण्यासाठी गायीची वाहतूक केली.
याप्रकरणी दिघी पोलिसांनी (दि. ५) रोजी दुपारी २.२० वाचे सुमारास अलंकापुरम सोसायटी समोर, अलंकापुरम रोड, वडमुखवाडी येथे कारवाई केली. दिघी पोलिसांनी आरोपी लक्ष्मण सुकदेव गायकवाड (वय ३८ वर्षे, रा. सस्ते वस्ती, कांदा मार्केटच्या जागेत, मोशी), रामेश्वर भगवान फुले (वय ४१ वर्षे, फुले वस्ती, च-होली फाटा), संदिप पंढरीनाथ तापकीर (रा च-होली बु), शाबीर कुरेशी (रा. पिंपरी) यांना ताब्यात घेतले.
आरोपीने त्याची ९५०० रु की ची गाय कत्तलीसाठी सह आरोपीला विक्री केली. त्याने ही गाय सह आरोपीच्या टेम्पोतून वाहतूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.


















