न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- मारुती सुझुकी इर्टीका (एमएच १४ एफसी ४१३६) या कार ने फिर्यादी तरूण घरी जात होता. त्या दरम्यान दोन टु व्हीलरवरुन आरोपी हे फिर्यादीच्या पाठीमागुन आले. त्यांनी हातातील रॉडने कारची मागील बाजुची काच फोडली. त्यामुळे फिर्यादीने गाडी थांबवली.
त्या दरम्यान आरोपींनी कारच्या पुढील बाजुचीही काच फोडत लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात, हातावर, पायावर व पाठीवर मारुन फिर्यादीला जखमी केले. आरोपींनी तरुणाच्या पॅन्टच्या खिशातील पैशांचे छोटे पाकिट व ८००० रुपये जबरदस्तीने नेले.
हा प्रकार (दि. ६) रोजी पहाटे २. ४५ च्या सुमारास लांडेवाडी चौकाच्या पुढे, नाशिक पुणे हायवे, भोसरी येथे घडला. फिर्यादी कुणाल संजय कांबळे (वय २३ वर्षे, रा. इंदिरा वसाहत, वाल्मिकी चौक, औंध) याने आरोपी दोन अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.