न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- ऑफिसमध्ये काम करत असताना आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. आरोपींनी ‘ तुम्ही श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्याप्रमाणे काम करा, नाहीतर तुम्हाला खोटया गुन्हयात अडकावु ‘ अशी धमकी देत हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने फिर्यादीचा हात पकडत त्यांच्याबरोबर अश्लिल चाळे व अश्लिल शेरेबाजी केली.
‘ आपन बाहेर जेवन करण्यासाठी जावु; तु माझ्याबरोबर बाहेर चल, बाहेरचे जेवण खुप वेगळे असते एकदा तरी जेवण करुन बघ, तु एकदा तरी माझ्या बरोबर फिरायला चल ‘ असे आरोपी फिर्यादीला म्हणाले. आरोपीस फिर्यादी यांनी विरोध केला असता फिर्यादी यांना कामावरुन काढुन टाकण्याची तसेच खोट्या गुन्हयात अडकविण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार मागील दीड वर्षापासुन ते दिनांक ७/१२/२०२२ रोजी १०.०० वाजेपर्यंत दि सेवा विकास बँक, पिंपरी येथे घडला. फिर्यादी महिलेने आरोपी मनोज लक्ष्मनदास बक्षाणी (वय ५४ वर्षे, रा. साई चौक, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.