न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर कशाच्या तरी सहाय्याने उचकटुन आरोपींनी आत प्रवेश केला. ५९,१६१ रु किंचे चांदीचे दागीने व ३३१५ रु किं सोन्याची नथ असा एकूण ६२,४७६ रु किं ऐवज अज्ञात चोरटयांनी घरफोडी करुन चोरुन नेला आहे.
हा प्रकार (दि. १०) रोजी सायंकाळी ६.४५ ते (दि. ११) रोजी सकाळी १०.०० वाचे दरम्यान वासुली येथील गुरुमुर्ती ज्वेलर्स ता. खेड येथे घडला. फिर्यादी राजेंद्र सदाशिव मुंडलिक (वय ५२ वर्ष, व्यवसाय गुरुमूर्ती, रा. इंदीरानगर, ओटास्कीम, सेक्टर नं. २२, निगडी) यांनी अज्ञात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. चाकण (महाळुंगे चौकी) पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.