न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- ओळखीच्या आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांना फॉरन डायरेक्ट इन्वेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवुण पैशांचा जास्त मोबदला देतो, असे आमिष दाखविले. फिर्यादीकडुन वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यावर २६,३५,००० रुपये घेतले. ठरलेल्या परताव्याची मागणी केली असता आरोपींनी टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे दिली. फिर्यादीस रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणुक केली.
ही घटना (दि. ३/३/२०२२) दुपारी २.३० वा ते (दि ०३/०४/२०२२) रोजी सायं ७.३८ वा. फलॅट नं ११, सर्व्हे ३२/१ व हरीओम कॉलनी नं १, बळवंतनगर, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी इरण्णा हनुमंत भुसरे (वय ३४ वर्षे, बिजलीनगर चिंचवड) यांनी आरोपी दिपक कृष्णा जगताप (वय ४८ वर्षे, रा. संभाजीनगर, चिंचवड), हरीशंकर मोहन मीणा (रा. जयपुर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.