न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- कामासाठी आरोपी फिर्यादीकडे गेला. दरम्यान फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या कंपनीतून ५५,००० रु. किं. चे १८७ किलो लोखंडाचे मटेरीयल फिर्यादीच्या संमतीशिवाय घेवुन गेला. फिर्यादीने आरोपीस माल नेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगितले तेव्हा आरोपीने फिर्यादीचा माल परत केला.
त्यानंतर फिर्यादीने १२/११/२०२२ रोजीपासुन ते दि. १०/१२/२०२२ रोजी पर्यंत कंपनीचे सीसीटीव्ही चेक केले असता आरोपीने कंपनीतून ६७,००० रू किंमतीचे अंदाजे २०० किलो लोखंडाचे तयार मटेरिअल (जॉब) घेऊन पळुन गेल्याचे त्यांना दिसले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १२/११/२०२२) रोजी पासुन ते (दि १०/१२/२०२२) रोजीपर्यंत नवनाथ इंडस्ट्री, शांतीनगर, भोसरी येथे घडली. फिर्यादी मच्छिद्र सखाराम तनपुरे (वय ५१ वर्षे, रा. रामनगर हौसिंग सोसायटी, प्रसन्न बिल्डींग, बिल्डींग ओ / १८, फ्लॅट नं. ४, लांडेवाडी, भोसरी) यांनी आरोपी रविंद्रकुमार मौर्या (रा. शांतीनगर, भोसरी, मुळगाव ग्राम पैकोली, नेवादाकला, आंबेडकर नगर, रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.