न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- मोबाईल (९६३५८९९५२०) क्रमांकावरुन फिर्यादीला आरोपीने कॉल केला. क्रेडीट कार्डचे स्टेंटमेंट पाहण्यासाठी QS (Team viewer Quick Support) हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगतले. त्या अॅपमध्ये फिर्यादी यांनी त्यांची वैयक्तीक माहिती भरली. तेव्हा त्यांच्या क्रेडीट कार्डमधुन आरोपीने ३७,२७० रुपये ऑनलाईनद्वारे पध्दतीने काढून घेत फिर्यादीची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २९.११.२०२२) रोजी सायं ६.०४ वा सुमारास सर्व्हे नंबर ५९३, बीईएच, मोगरे निवास, गणेशनगर, जाधववाडी, चिखली येथे घडली.
फिर्यादी नामदेव अर्जुन चव्हाण (वय २६ वर्ष, रा. गणेशनगर, जाधववाडी, चिखली) यांनी आरोपी मो.नं ९६३५८९९५२० यावरील अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















