न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील ३८६ जागांसाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या १ लाख ३० हजार ४७० अर्जांपैकी छाननीत ८५ हजार ७७१ उमेदवारांचे अर्ज पात्र झाले आहेत. या अर्जांच्या परीक्षा शुल्कातून महापालिका कोषागरात सुमारे ७ कोटी रुपये जमा झाले आहेत. तब्बल २ हजार १७४ हजार माजी सैनिकांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. तर, अर्ज पात्र होवूनही १ हजार ६९ जणांनी परीक्षा शुल्क भरले नाही.
या रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने (PCMC News) भरती करण्याकरिता ‘ब’ आणि ‘क’ गटातील ३८६ जागांसाठी १३ ऑगस्ट २०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये लिपिक-२१३, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- ७५, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-४१, कनिष्ठ अभियंता (विद्युत) १८, आरोग्य निरीक्षक-१३, अतिरिक्त कायदा सल्लागार-१, विधी अधिकारी-१, उपमुख्य अग्शिमन अधिकारी-१, विभागीय अग्निशमन अधिकारी – १, उद्यान अधिक्षक (वृक्ष) – १, सहाय्यक उद्यान अधिक्षक- २, उद्यान निरीक्षक-४, हॉट्रीकल्चर सुपरवायझर-८, कोर्ट लिपिक – २, अॅनिमल किपर – २ आणि समाजसेवकाच्या ३ अशा ३८६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते. ऑनलाईन प्राप्त झालेल्या १ लाख ३० हजार ४७० अर्जांपैकी छाननीत ८५ हजार ७७१ उमेदवारांचे अर्ज पात्र झाले आहेत. त्यामुळे ३८६ जागांसाठी ८५ हजार ७७१ परीक्षार्थी असणार आहेत. तब्बल २ हजार १७४ हजार माजी सैनिकांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.
लिपिकाच्या २१३ जागांसाठी सर्वाधिक म्हणजेच ३३ हजार ८९७, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) साठी ३० हजार ९०८, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी १२ हजार २६१, कनिष्ठ अभियंता (विद्युत) साठी ४ हजार ३८२, आरोग्य निरीक्षक १ हजार ९३९, समासेवक १ हजार ४३३, हॉट्रीकल्चर सुपरवायझर २२३, उद्यान निरीक्षक १५३, विधी अधिकारी १२९, उद्यान अधिक्षक १२२ असे ३८६ जागांसाठी ८५ हजार ७७१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जातून महापालिका कोषागरात ६ कोटी ९९ लाख १७ हजार ६०० रुपये जमा झाले आहेत. आता परीक्षा कधी होणार याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.


















