- अध्यक्षासह इतरांवर गुन्हा दाखल; वाकडमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- सहकारी गृहरचना संस्थेच्या सभासदांचा आरोपींनी विश्वास संपादन केला. सोसायटीच्या कामासाठी सोसायटी मेंटेनन्सकरीता सभासदांनी आरोपींकडे रक्कम दिली होती. या रक्कमेतील एकुण १६,५९,४८० रुपयांचे व्हाऊचर, चलन व बिलाव्दारे गैरव्यवहार व अपहार करीत संस्थेची आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १/०४/२०१८ ते ३१/०३/२०२०) दरम्यान ओमेगा पैराडाइन १, नं. १७४/१७५. दत्तमंदीर रोड, वाकड येथे घडला.
फिर्यादी राजेंद्र सिताराम कांबळे (वय ५२ वर्षे, रा. श्री. स्वामी समर्थ सहकारी गृहरचना संस्था मर्या., पाषाण सुस रोड, पुणे) यांनी आरोपी अध्यक्ष सुमित भाटिया (वय ४० वर्षे अंदाजे रा. प्लॉट नं. आय ०९०१ सर्व्हे नं. १७४/१७५ ओमेगा पॅराडाईज सोसायटी दत्तमंदीर रोड वाकड), राजेश रमन (वय ४५ वर्षे अंदाजे रा. प्लॉट नं. आय ०७०१ सर्व्हे नं. १७४/१७५ ओमेगा पॅराडाईज सोसायटी दत्तमंदीर रोड वाकड), सचिव नईम इकबाल मिर्झा (वय ५० वर्षे अंदाजे), व्यवस्थापक सुरेश यादव (वय ४० वर्षे अंदाजे रा. चौधरी पार्क वाकड), व्यवस्थापक (गोविंद चितळकर, वय ४५ वर्षे अंदाजे रा. जुनावने नगर, इंद्र वसाहत, औंध), लेखापाल विजय चटके (वय ३५ वर्षे अंदाजे रा. आनंदनगर खंडाळे चौक चिंचवड), प्राधिकृत अधिकारी जितेंद्र विटकर (वय ४० वर्षे अंदाजे रा स्मृती अपार्टमेंट, फ्लॅट नं.१०, विजयनगर, काळेवाडी), मॅनेजर (वय ३५ वर्षे अंदाजे रा. घर नं. ५५४ आनंदनगर अंबाला कॅन्ट मेन्ट हरियाणा), चैतन्य वॉटर सप्लायर्स (सर्वे १/१ वाकड, ओवरब्रिज समोर, वाकड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















