न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातून तीनच दिवस असतील, अशी नोटीस दालनाबाहेर लावली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत विविध कामांसाठी नागरिक आणि लोकप्रतिनिधी येत आयुक्तालयात असतात. अधिकारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असले,तरी नागरिकांना भेटण्यासाठी विशिष्ट वेळ ठेवण्यात आलेला असतो. किंवा आयुक्तांची वेळ घेऊनही नागरिकांना भेटायला येत असतात. तसेच आयुक्त दौऱ्यांवर किंवा कामात असतील तर अतिरिक्त आयुक्तही नागरिकांचे प्रश्न जाणून घेत असतात.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. अर्थात, आयुक्त नसतील त्या दिवशी नागरिकांचे प्रश्न अतिरिक्त आयुक्त जाणून घेणार आहेत. कामकाजाचा भाग म्हणून सूचना लावली आहे. इतर वेळीही नागरिक वेळ घेऊन भेटायला येऊ शकतात, असे अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
















