न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- रस्त्यावर सेलीरियो (एम एच १४ एच क्यु ४६४६) गाडी उभी होती. ती बाजुस घेण्यास फिर्यादीनी हॉर्न वाजविला. त्यादरम्यान आरोपीने जवळ येवुन फिर्यादीशी अश्लील वर्तन केले.
“तू कोण पोलीसवाली आहे, तु युनिफॉर्ममध्ये आहेस का, पोलीसांची यात्रा जमव इथे, तुझा खुन करतो, तुझ्या बापाला वर येवुन देत नाही, तु उदया दिसणार नाही” असे बोलून “अश्लील भाषा वापरत तुला सांगतोच आता मी कोण आहे” अशी धमकी दिली. सहआरोपीने ” तु मला ओळखते का, मी इथला गाववाला आहे” तसेच अश्लील बोलून शिवीगाळ केली. तसेच तिसऱ्या सहआरोपीने फिर्यादीस अश्लील शब्द बोलुन फिर्यादीचा हात धरुन गाडीवरुन खाली ओढले, आरोपी यांनी फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १५) रोजी दुपारी १२.१५ वा. ऑक्सी एलियन्स सोसायटी गेटच्या समोर रोडवर, आळंदी रोड, भोसरी येथे घडली. महिला फिर्यादी यांनी किरण बबन कोतवाल (वय ३२ वर्षे), कमलेश बबन कोतवाल (वय ३४ वर्षे), कमल बबन कोतवाल (वय ५७ वर्षे, सर्व रा. श्रीराम कॉलनी, भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
















