न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- सकल हिंदू समाज समन्वय समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने रविवारी (दि. १८) सकाळी नऊ ते अकरा दरम्यान हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल रविवारी सकाळी आठ ते दुपारी चारा वाजताच्या कालावधीसाठी असेल. याबाबत वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश दिले आहेत.
महावीर चौक चिंचवडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्विस रोडने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद आहे. ही वाहने डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मधून इच्छित स्थळी जातील.
नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे सर्विस रोडने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद आहे. ही वाहने डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पेट्रोल पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर येथून इच्छित स्थळी जातील. स्व. इंदिरा गांधी पुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने मोरवाडी चौकातून इच्छित स्थळी जातील. नेहरूनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने एच ए कॉर्नर बस स्टॉप येथून रसरंग चौक, ऑटो क्लस्टर मार्गे इच्छित स्थळी जातील. केएसबी चौक व बसवेश्वर चौकाकडून महावीर चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने ऑटो क्लस्टर पासून मदर तेरेसा पुलावरून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील. भक्ती शक्ती खंडोबामाळ चौकाकडून पिंपरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने टायटन शोरुम / चर्च समोरील ग्रेड सेपरेटर इन मधून इच्छित स्थळी जातील. पिंपरी पोलीस ठाणे पाठीमागून महावीर चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने शिवाजी चौक येथून इच्छित स्थळी जातील. रिव्हर व्ह्यू चौक, चाफेकर चौकाकडून येणारी वाहने महावीर चौक शिवाजी चौक मार्गे जातील.
















