न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- पिंपरी पोलीस चौकीच्या बाहेर फिर्यादीसह त्यांचे नातेवाईक पायी चालत होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्या हिस्याची जमीन आरोपी शेख याला विकली नाही, या कारणावरून चिडून जावून आरोपी एकत्र जमले. फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईक यांना ‘ तुला हिस्सा पाहिजे, तुला पैसे पाहिजे ‘ असे म्हणत आरोपींनी हाताने मारहाण करून फिर्यादीच्या हाताला चावा घेत त्यांना जखमी करीत वाईट वाईट शिवीगाळ केली.
फिर्यादीला धमकी दिली. आरोपीने फिर्यादी यांची नात हीच्याशी अश्लील वर्तन करीत तीचा विनयभंग केला. सह आरोपीने ‘ तु बाहर मिल, तेरे को दिखाता, तेरे को नंगी करके मारेगा ‘ असे अश्लिल शब्द वापरले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १५) रोजी सायं. ५.०० वा. चे सुमारास पिंपरी पोलीस चौकीच्या बाहेर, पिंपरी रेल्वे स्टेशन रोड, पिंपरी) येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी स्वप्नील शंकर पारखे (रा. न्यू इंद्रप्रभा, विकासनगर, देहुरोड), महिला आरोपी (रा. शांताई क्लासिक, रावेत), सागर शंकर पारखे (रा. शांताई क्लासिक, रावेत), प्रशांत प्रकाश पारखे (रा. शांताई क्लासिक, रावेत), महिला आरोपी (रा. शांताई क्लासिक, रावेत), अशरफ रज्जाक शेख (रा. विकासनगर, देहुरोड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.
















