न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- राज्य सरकारने अजय मोरे यांची पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. मोरे यांनी शुक्रवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
सध्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय देशमुख यांची बदली झाली असली तरी त्यांच्या नियुक्तीचे आदेश अद्याप काढलेले नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
मोरे यांनी यापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानात कार्यकारी अधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प तसेच जळगाव जिल्ह्यात प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे.
















