- भोसरीतील प्रियदर्शनी इंग्लीश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- शाळेत शिकत असताना फिर्यादीचा १५ वर्षीय मयत मुलगा मारहाण करतो. शाळेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करत नाही. शाळेतुन रस्टिकेट करतो, शाळेत पाठवू नका, असा आरोपीने फिर्यादीच्या मुलाला शारीरीक व मानसिक त्रास दिला. त्याला राहत्या घरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १०) रोजी रात्री ८.१५ वा. ते (दि. १३) रोजी पर्यत. फ्लॅट नं. ६, लक्ष्मी अपार्टमेंट, शनि मंदीराच्या शेजारी, गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडला.
या प्रकरणी ३७ वर्षीय महीला फिर्यादी यांनी आरोपी प्रियदर्शनी इंग्लीश मिडीयम स्कुल (दिघी रोड, भोसरी) चे मुख्याध्यापक हितेश शर्मा (वय अंदाजे ४० वर्षे, रा. शेकावटी सदन, आदिनाथ नगर, गव्हाणेवस्ती, भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















