न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च) :- अर्ध्या हाळकुंडाने पिवळे झालेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी विनाकारण राजकिय प्रसिध्दी मिळविण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टिका करून, प्रसिध्दीचा केविलवाना प्रयत्न करू नये, असा इशारा शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे.
ज्या छञपती शिवाजी महाराजांनी अखंड बाराबलुतेदार समाज बांधवाना एकञीत करून, रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचे प्रतीबिंब अमोल कोल्हे यांच्या रूपात जनता पहात आहे. याचा अर्थ असा समजु नये की, आम्ही शिवसैनिक आपण जे बेताल वक्तव्य कराल ते सहन करणार आहोत. याद राखा गाठ छञपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याशी व वंदनिय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांशी आहे.
अमोल कोल्हे खुप चांगले कलाकार, अभिनेता आहेत. त्यांच्या कष्टाला व कलेला माझा भगवा सलाम आहेच, पण ते नेते होऊ शकत नाहीत. कारण नेते व उपनेते ही जबाबदारी फक्त शिवसेनेमध्येच मिळते. चौथा षटकार हा खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे सर्वसामान्य जनतेच्या व माता भगिनींच्या आशिर्वादाने मारणारच. शेवटी बॉलर हा कोणीही असो, असे दाखले यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.











