न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ५ मार्च) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरीतील मेळाव्यात बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, मेळाव्याला सुरुवात करताना अजित पवारांनी मला विचारलं होतं, सुरुवात कुठून करावी? तेव्हा अजित पवारांनी विनंती केली सुरूवात करायची असेल, तर घरातुन केली तर बर वाटत. त्यामुळे एक घर नारायणपुरला आणि दुसर घर भोसरीला. त्यामुळे दोन्ही घरातलीच मानस असली पाहिजेत, असा एक हट्ट होता म्हणून अजितदादांनी ही विनंती मान्य केली. अन भोसरीतुन सुरुवात कर असा सल्ला दिला.
पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, भोसरीकरांनो तुमच्यासमोर परिवर्तनाची नांदी घेऊन आलोय. परिवर्तनाची नांदी कशासाठी? तर देश आज परिवर्तनाच्या नांदीसाठी उभा आहे. परिवर्तनाचा विचार उभा आहे. २०१४ साली तुम्ही, मी एका विचाराने मतदान केल. जेवढी आश्वासने त्यावेळी केली गेलेली होती, ते पोस्टर होत. छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन जे सरकार सत्तेवर आले. त्याच छत्रपतींनी सांगितलं होतं रयतेच्या काडीला आणि भाजीच्या देठाला हात लावू नका. त्याच सरकारच्या त्या छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन आलेल्या सरकारच्या कालखंडात मात्र शेतकऱ्यांची दुर्दशा झाली. इतकच नाही तर ज्या स्वायत्ता संस्था आहेत सीबीआय असेल, न्यायपालिका असेल, रिझर्व्ह बँक असेल या प्रत्येक स्वायत्त संस्थेवर टाळ चालली गेली.
त्या छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन पुढे जाणार सरकार मात्र, कुठ तरी एककल्ली हूकुमशाही पद्धतीने जाताना दिसत आहे. तेव्हा खरोखर याची जाणीव होते की, आता परिवर्तनाची गरज आलेली आहे. तीन वर्षांपूर्वी आम्हाला सांगण्यात आल होत की, नोटाबंदी झाली तर काळा पैसा पूर्ण बाहेर येईल. काळा पैसा पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच ते फंडीगं होत. पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना जी रसद मिळते ती रसद थांबेल आणि ते दहशतवादी हल्ले थांबतील. अशा भूलथापांना देशातील नागरिकांना बळी पाडले होते.
देश आता परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. केंद्रातल सरकार बदलणार आहे आणि मराठी माणूस शरद पवारांच्या रुपाने देशाच्या जवळ जाताना आपणाला दिसणार आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच खासदार असला पाहिजे, असे मत डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले.















