न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने वैयक्तिक घरकुल योजनेसाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत येणाऱ्या तालुक्यातील दूरच्या लाभार्थ्यांना आपल्या अर्जाबाबत माहिती मिळण्यासाठी तसेच कार्यालयात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ४ अंतर्गत वैयक्तिक स्वरुपातील घरकुल स्वमालकीच्या जागेवर बांधण्यास अनुदान (बीएलसी) दिले जाते. पीएमआरडीएकडून त्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ हजार ८४१ लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालाला केंद्र व राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ५ हजार २७१ लाभार्थ्यांच्या अहवालास ३१ मार्च २०२२ रोजी मंजुरी मिळाली आहे. पीएमआरडीएने त्याबाबतच्या अंमलबजावणीसाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. सल्लागाराने आजपर्यंत एकूण १९ हजार ११२ लाभार्थ्याच्या प्रकल्प अहवालावर कार्यवाही केली आहे. तसेच, १० हजार ८६० लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. पीएमआरडीएने www.pmaypmrda.in या संकेतस्थळाची त्यासाठी निर्मिती केली आहे. त्यामध्ये सर्व तालुक्यातील मंजुरी प्राप्त १९ हजार ११२ लाभार्थ्यांची डीपीआरमधील मंजूर लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे.
मंजूर लाभार्थ्यांना दिलेल्या बांधकाम कार्यादिशाची यादी. डीपीआरमधील अपरिहार्य कारणाने रद्द करावयाच्या लाभार्थ्यांची यादी (कारणांसह), वैयक्तिक आणि
मंजुरीबाबतची माहिती. लाभार्थ्यांना अनुदान वितरित केल्याची माहिती तालुकानिहाय प्रकल्प अहवालाची यादी प्रसिद्ध आहे. तसेच, सर्व तालुक्यात मिळून १० हजार ८३६ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश वितरित लाभार्थ्यांची यादीदेखील या संकेतस्थळावर आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांबाबत सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी pmaypmrda हे अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅप उपलब्ध केले आहे. मंजूर डीपीआरमधील लाभार्थ्यांना संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती तसेच इतर सुविधा प्राप्त करण्यासाठी लॉगिन करावे लागेल. या लॉगिन आधार, मोबाईल क्रमांक टाकून ओटीपीच्या सहाय्याने केल्यानंतर लाभार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहे.
” लाभार्थ्यांसाठी अनुदान मागणी, पासबुक संकेतस्थळावर अपलोड करणे, ज्यांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यांनी योजनेचा बोर्ड (पोर्टलवरील प्रस्तावित नमुन्यात) घराच्या दर्शनी भागात लावावा. तसेच लाभार्थ्यांना स्वतःच्या घराचे जिओटॅग फोटो अपलोड करण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. संकेतस्थळावरील विविध सुविधांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. – – राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए…















