- विजयनगर, काळेवाडीतील घटना; पोलिसांकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- भिशीचे ३.५ लाख रुपये परत केले नाही म्हणुन आरोपीने फिर्यादीच्या घराखाली येवुन फिर्यादीला फोन करुन खाली बोलावुन घेतले. ” अभी तक पैसा नही दिया; बोहत तेरा नाटक सेहन किया है, तेरी माँ चोद दूंगा, तेरे को रस्ते पे लाऊंगा ”, अशी घाणघाण आई बहिणीवरून शिवीगाळ केली.
तिसरा सह आरोपी याने फिर्यादी यांना खाली जमिनीवर पाडुन कमरेच्या बेल्टने तोंडावर व अंगावर मारहाण करुन जखमी केले. आरोपीचा भाऊ याने रस्त्यावर पडलेला दगड डोक्यात फेकुन मारुन फिर्यादीला जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २९) रोजी रात्री १२.३० वा चे सुमा. फिर्यादीच्या घरासमोर, श्रीगणेश निवास, सव्हें नं ११०/१/३८, अष्टविनायक कॉलनी ए, विजयनगर, काळेवाडी येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी सावल तोताणी, मुन्ना तोताणी, गौरव तोताणी (सर्व रा. साई ईमरल्ड सोसा, विजयनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















