न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- मॉर्निंग वॉकसाठी फिर्यादी व त्यांचा मित्र गेले होते. दरम्यान अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या रुमच्या उघडया दरवाज्यामधून आत मध्ये प्रवेश केला. फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या मालकीचे ४२,००० रुपये किमतीचे ४ मोबाईल चोरुन नेले आहेत.
ही घटना (दि. २९) रोजी सकाळी ६.०० वा ते ७.३० वा चे सुमारास वाल्हेकर हाईटस, जिजामाता चौक, रुम नंबर ३, वाल्हेकरवाडी येथील फिर्यादीच्या रुममध्ये घडली. फिर्यादी आशिष इश्वर पाटील (वय २५ वर्ष, रा. वाल्हेकरवाडी) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















