न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- तळेगाव दाभाडेतील गणपती चौक ते पोरवडी स्टेशन दरम्यान मुलांना फुस लावुन पळवून नेण्याची घटना घडली आहे.
आरोपीने फिर्यादीची मुलगी वय ३ वर्ष, व फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या महीलेचा ५ वर्षांचा मुलगा यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार (दि. ४) रोजी सकाळी ११.०० वा. घडला.
२३ वर्षीय महिला फिर्यादीने महीला आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.















