न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- कासारसाई येथील आकाशिया प्रोजेक्टमध्ये स. नं. ४१ आणि ४६ मध्ये प्लॉट बुक करण्याचे आरोपीने आमिष दाखविले. फिर्यादी आणि साक्षीदार यांना प्लॉट खरेदी करण्यासाठी पैसे गुंतविण्यास भाग पाडले.
पैसे घेवूनही प्लॉट न देता फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांची एकूण ७६ लाख ५१ हजार ९९६ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणुकीचा प्रकार सन २०१३ ते २०२० या कालावधीत घडला.
फिर्यादी डॉ. आनंद प्रभाकर झिंगाटे (वय ४२ वर्षे, रा. एच-१०३, सप्तसुर, डीएसके विश्व, धायरी) यांनी आरोपी आकाशिया या प्रोजेक्टतर्फे मालक के. शब्बीर बाबु याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















