न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- तळेगाव दाभाडे येथे दुर्गा मंदिर आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात आणि परिसरात कोणीही नसल्याची खात्री केली. अवघ्या तीस सेकंदात दोघा अज्ञातांनी मंदिरातील दान पेटी पळवून नेली.
काही अंतरावर ती फोडली आणि त्यातील पैसे घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. दानपेटीत किती पैसे होते हे अद्याप समजू शकले नाही.
















