न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- ट्रेलर (एमएच ४६ बीएम ६५९१) आरोपीने भरधाव वेगात चालवला. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला वाहन चालवीत मारुती इरटिका गाडी (एमएच ०१ बीयु ७१११) ला समोरुन धडक दिली. अपघातात कार चालक गजराज फत्तेह सिंग (वय ४१ वर्ष रा. पाईपलाईन, मरोळ अंधेरी, मुंबई) हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
इरटिका कारचे ५ लाखांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती न देता आरोपी ट्रेलर चालक पळुन गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २) रोजी दुपारी २.०० वा चे सुमारास चाकण-तळेगाव दाभाडे येथील डांबरी रस्त्यावर घडला.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विक्रम मखई बेलदार (वय ३७ वर्षे रा. ज्योती ट्रान्सपोर्ट, सर्विस डीसमा कॉम्प्लेक्स, ४ माळा ए ४०१, कळंबोली स्टील मार्केट, ता. पनवेल जि. रायगड, मुळ रा. कटाई टिकर खास ता. सजनव्वा जि. गोरखपुर, उत्तरप्रदेश याला पोलिसांनी अटक केली आहे.
















