- कस्तुरी डेव्हलपर्सच्या मालकाकडून एकाची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- विकसन करारनाम्यामधील अटी आणि शर्त्नींचा भंग केला. फिर्यादीच्या मालकीच्या जागेवर बांधकाम पूर्ण करून दिले नाही. तसेच ‘ तुम्ही त्या जागेवर कसे काय बांधकाम करताय ‘, असे फिर्यादीला धमकाविले.
फिर्यादीच्या ३२ फ्लॅटचे एकूण ५,७६,००,००० रक्कमेचे आरोपीने आर्थिक नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार १९/०९/२०१६ पासुन ते आजपर्यंत कस्तुरी डेव्हलपर्स येथे घडला.
फिर्यादी अभिमन्नु एकनाथ काळोखे (वय ४८ वर्षे, रा. १७/४ दत्तनगर, निगडी) यांनी आरोपी तुषार सत्यविजय हेडा (वय ४२ वर्ष, रा. सुखवाणी रेंसीडेन्सी), महिला आरोपी (रा. सुखवाणी रेसीडेन्सी, दापोडी) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















