न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- केंद्र सरकारचा मागासवर्गीय समाजातील महिलांकरीता १०० रुपयात उज्वला गॅस कनेक्शन वितरणाचा कार्यक्रम काळेवाडीतील तापकीरनगर परिसरातील हॉटेल राजरत्न, तापकीरनगर येथे पार पडला.
चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना ऊज्वला गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक चंद्रकात नखाते, बाबा त्रिभुवन, शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविता खुळे, चंद्रकांत तापकीर, नरेंद्र माने, मल्हारी तापकीर व आदी उपस्थित होते.
शहरात इंधनाचा तुटवडा. महाग झालेले इंधन तसेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याबरोबरच महिलांमध्ये आजार वाढीस लागले असून, ते रोखण्यासाठी उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन देण्याचे काम प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे महिलांचे आयुष्यमान उंचावण्याचे काम खऱ्या अर्थाने होत असल्याचे मत नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी व्यक्त केले.











