न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- बीएसआर्स स्पर्श फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ़ लोकमान्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “स्त्रीच्या सन्मानार्थ, पेडल फॉर चेंज या पुणे ते दिल्ली सायकल रॅलीला आज झेंडा दाखवून प्रारंभ झाला.
ऑटो क्लस्टर येथे झालेल्या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, रोटरीचे माजी प्रांतपाल सुबोध जोशी, रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या अध्यक्षा वासवी मुळे, देवानंद देशमुख, स्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष व समन्वयक भूपेंद्रसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
राठोड म्हणाले की, महिलांनावर अत्याचार खूप होतात. त्यापैकी ७० टक्के तक्रारींची नोंदच नसते.महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, स्त्री अत्याचारावर आवाज उठावा, इंधन बचत, आरोग्य,पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या हेतूने या “पेडल फॉर चेंज” सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या सायकल रॅलीत २० जण सहभागी झाले आहे. यापैकी ९ ज्येष्ठ नागरिक, २ महिलांचा समावेश आहे. पिंपळे सौदागर येथून शुक्रवारी सकाळी सायकलिंग ला प्रारंभ केला. मुंबई, गुजरात, राजस्थान दिल्ली या मार्गाने सायकल रॅली काढण्यात येणार आहे.
या २० सायकलपटूचा सन्मान डेक्कन जिमखाना येथे आयोजित कार्यक्रमात रोटरीचे प्रांतपाल शैलेश पालेकर, नियोजित प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी जैन हिने केले तर आभार अजय वाघ यांनी मानले.
सहभागी झालेले सायकलपटू पुढीलप्रमाणे :
भूपेंद्रसिंग राठोड, तानाजी सावंत, अनिल पिंपळेकर, पद्माकर आगाशे, स्मिता मलठणकर, दीपा शेंबेकर, अनिल जोशी, अविनाश मेढेकर, सुहास सोमण, लवेश कुमार, संजय कट्टी, मिलिंद सैंदाणे, डॉ सुभाष कोकणे, दिग्विजय जोधा, अक्षय घोरपडे, अनंत कुंभारे यांचा समावेश आहे.











