न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- पुणे रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन होते. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली होती. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, हा फोन कोणी केला धमकी देणाऱ्या इसमाचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे.
मध्यरात्री एका इसमाने कॉल करून मळवली ते काने स्टेशन दरम्यान बॉम्बस्फोट घडून येईल ही माहिती दिली. या फोननंतर लोहमार्ग पोलीस स्टेशनने आसपासच्या ठिकाणी तपासणी सुरू केली. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनमध्ये रात्री ८ वा दरम्यान दहशत हल्ला करण्यात येईल अशी माहिती मिळताच, लोहमार्ग पोलीस जीआरपीएफ व स्थानिक पोलीस व श्वान पथकाच्या मदतीने पुणे रेल्वे स्टेशन येथे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आली होती.
तर हा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्या व्यक्तिचं नाव गोविंद भगवान मांडे वय ३८ आहे. हा मूळचा परभणीचा आहे. मागील १ महिन्यापासून कात्रज येथे वॉचमनची नोकरी करत होता. त्याने गाडी मनमाड स्टेशन येथे जास्त वेळ थांबली आणि बोगीमध्ये एका पॅसेंजरशी वाद झाला होता. त्यामुळे तो राग मनात धरून कॉल केला. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.