- पिंपरी चिंचवड शहरातील १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ ने धडाकेबाज कामगिरी करीत भरदिवसा पडलेल्या दरोडयातील आरोपींना गजाआड केले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतील १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड झाले आहेत.
तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे हददीत (दि. १०) रोजी दुपारी १:४५ वा. सुमारास ५ अनोळखी इसमांनी भरदिवसा दरोडा टाकला. २४ तोळे सोने व रोख रक्कम इतर मौल्यवान ऐवज चोरी करुन आरोपी पळुन गेले. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. १७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९५, ४५२,३२३,५०६ (२) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५, शस्त्र अधिनियम ३.२५ ४२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या सर्व पोलीस पथकांना व पिंपरी चिंचवड हददीतील सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणुन आरोपीना अटक करण्याबाबत आदेश दिला होता.
गुन्हयाचा तपास वरीष्ठांनी गुन्हे शाखा युनिट ३ कडे वर्ग केला. गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोहवा /४७९ विठठल सानप व पोशि/ २८७७ रामदास मेरगळ यांना गुन्हयामध्ये सहभाग असणारे आरोपींबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने गुन्हयातील आरोपीचा शोधु घेवुन सापळा रचुन गुन्हयातील आरोपी अमर हरिदास दहातोंडे (वय २० वर्षे, रा. वडाळा ता.नेवासा जि.अहमदनगर, सध्या रा.चिबळीफाटा, बर्गेवस्ती, यशवंत जाधव यांचे खोलीत, खेड जि.पुणे), अनिल गोरखनाथ मस्के (वय ३० वर्षे, रा. चिंबळी फाटा, बर्गेवस्ती यशवंत जाधव यांचे खोलीत भाडयाने, मुळ रा. समतानगर, (बारवाई) ता. पनवेल जि. रायगड), राजु रविशंकर यादव (वय ४२ वर्षे, रा. तळेगांव दाभाडे, गणपती चौक, ता. मावळ जि. पुणे, मुळ रा. उत्तप्रदेश), सोपान अर्जुन ढवळे (वय २४ वर्षे सध्या रा. तळेगांव दाभाडे, गणपती चौक, ता. मावळ जि. पुणे., मुळ रा. शहारा ता. लोणार जि.बुलढाणा), प्रशांत राजु काकडे (वय ३० वर्षे, रा. तळेगांव दाभाडे, गणपती चौक, ता. मावळ जि. पुणे) यांना गुन्हे शाखा युनिट ३ ने अटक केली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी राजु रविशंकर यादव हा अलिबाग पोलीस ठाणे गु.र.नं. १८/२०१२ भा.दं.वि. कलम ३९५, ३४,१२० ब या गुन्हयात ८ वर्षे जेल मध्ये राहुन मोका गुन्हयातुन जामिनावर सन २०२० मध्ये सुटला आहे. तसेच अनिल मस्के हा पनवेल पोलीस ठाणे गु.र.नं. ६४/२०१४ भा.दं.वि. कलम ३०२, ३४ मधुन जामिनावर आहे. यातील आरोपी राजु यादव व सोपान ढवळे यांना हॉटेल व्यवसाय करायचा असल्याने ते पैश्याची जमवामवी करीत असताना तळेगांव परीसरात फिरत असताना त्यांना समजले की, फिर्यादी हे पुर्वी गुटख्याचे व्यापारी होते ते पूर्वी जेलमध्ये असल्याने त्यांच्या घरी भरपूर काळा पैसा दडवून ठेवलेला आहे, असे समजले. नंतर राजु यादव व त्याचे साथीदार अनिल मस्के, अमर दहातोंडे, प्रशांत काकडे, सोपान ढवळे यांनी संगनमत कट करुन हत्यारांची जमवाजमवी करुन दरोडा त्यांनी टाकल्याच्या त्यांनी कबुल केले आहे.
तसेच इतर दोन आरोपी अनिल मस्के व अमर दहातोंडे यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतील चाकण, आळंदी, दिघी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तळेगाव दाभाडे परीसरातील एकुण १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. आरोपीकडून चैनस्नॅचिंग गुन्हयातील एकुण १९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले आहेत.
याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ३ ने एकुण ५ आरोपी अटक करुन एक दरोडयाचा गुन्हा, १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे, तसेच वापरलेल्या दोन मोटर सायकल जप्त करुन, एक मोटर सायकल चोरी लोणीकंद पो.स्टे चा गुन्हा उघड, एकुण ०२ गुन्हयात पिस्तुले २२ जिवंत काडतुसे, १०,००० रुपये रोख रक्कम, ४३० ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत करून एकुण २५,२७,००० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ही कारवाई ही पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ यांनी केली आहे.