न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- लघुशंकेसाठी फिर्यादी थांबले असता अज्ञात मोटार सायकलवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. फिर्यादीला चाकुचा धाक दाखवला.
फिर्यादीकडील चाळीस हजार रूपये किंमतीची हिरो कंपनीची (एमएच १४ जीक्यु ९९३४) डयुट मोपेड व २५०० रूपये किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ४२,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावुन नेला आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी रात्री ९.३० वा.चे सुमारास जुना मुंबई-पुणे हायवे रोडवर, पुना गेट हॉटेलचे १०० मी पुढे, देहुरोड येथे घडला. फिर्यादी धीरज मोती शाही (वय ३२ वर्षे, व्यवसाय वॉचमन, रा. लोट्स स्पीनेगल सोसायटीच्या पार्किंगमध्ये, साईनगर, मामुर्डी, देहुरोड) यांनी आरोपी अज्ञात तीन इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.


















