न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- ‘ ५० हजार रुपये दिले तरच तुम्हाला घरात जावुन देवु ‘, फिर्यादीची सासु (वय ७० वर्ष), नणंद (वय ४८) या बॅग घेवुन घरी राहण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना धमकी दिली. घरात जाण्यास विरोध केला. आरोपी यांनी फिर्यादीशी हुज्जत घातली. दोघांनी मिळुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन फिर्यादी व फिर्यादीची नणंद यांच्या पोटात जोराने लाथा घातल्या.
आरोपीने फिर्यादीला ड्रेससह पकडुन जोरात ढकलले. फिर्यादीच्या ड्रेसची डावी बाजु फाटल्याने फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली. गेल्या ६ वर्षापासुन आरोपीला फिर्यादीने विश्वासाने घर भाडयाने दिले. फिर्यादीचा विश्वासघात करुन फिर्यादीच्या घरामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करुन फिर्यादीच्या भाडयाचे ६ लाख रुपये न देता फिर्यादीची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि १९/०१/२०२३) रोजी दुपारी १.४५ वा चे सुमारास लोटस नंदनवन, ई विंग, बिल्डींग नंबर १, फ्लॅट नं. ४२६ मध्ये, बो-हाडेवाडी, मोशी येथे घडला. महीला फिर्यादी (वय ५० वर्षे) यांनी आरोपी ओमप्रकाश देवगडकर (वय अंदाजे ५० वर्ष), महीला आरोपी (वय अंदाजे ४५ वर्ष) यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















