न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- ‘ गुरांचा गोठा ‘ रस्त्यावर वाढवुन अतिक्रमण केले. त्याविरुध्द फिर्यादीनी नगरपालिकेत तक्रार अर्ज केला होता. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजुस, उजव्या डोळयावर, डाव्या कानावर लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. फिर्यादीचा मित्र विजय सुतार यालाही शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी सकाळी १०:३० वा. चे सुमारास बॉम्बे कॉलनी येथे प्रमोद देवाकाते यांच्या जागेत, दापोडी येथे घडला.
फिर्यादी किशोर वसंत काटे (वय ४० वर्षे, धंदा कंन्ट्रक्शन, रा. फ्लॅट अ-३, गणेश कॉर्नर, दापाडी) यांनी आरोपी ऋषिकेश इंद्रभान साखरे (रा. महादेव आळी, सातकर चाळ, दापोडी) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.