न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- कैलास ज्वेलर्स दुकानात प्रवेश करुन आरोपींनी दुकानातील कामगाराची नजर चुकविली. ३८.९८० ग्रॅम वजनाची अंदाजे १,६०,००० रुपये किमतीच्या चैनची चोरी करून नेली आहे.
ही घटना (दि. १८) रोजी ४.०० वा ते ४.४५ वा चे दरम्यान संत तुकारनगर पोलीस चौकीच्या पाठीमागे, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी हंसराज प्रमराज चौधरी (वय ३८ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. पिंपरी) यांनी आरोपी अज्ञात २ महीला व १ पुरुष यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















