न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- एटीएम वायफाय डेबिट कार्ड आरोपीला सापडले. आरोपीने त्याचा गैरवापर केला. विविध ठिकाणी ते स्वाईप केले. फिर्यादीचे पैसे काढून त्याचा गैरवापर केला. तसेच फिर्यादी यांनी त्यास थांबविले असता त्यांना अरेरावीची भाषा करुन निळया रंगाच्या टीव्हीएस (एमएच १२ जेएन ५८०२) गाडीवरुन आरोपी पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी सायं.७.३० वा. चे सुमारास अल्डीया पुराणिक सोसायटी, ऑर्चिड हॉटेल समोर, फेज-४, बी/५०३, म्हाळुंगे व दुपारी ४.०० वा. चे सुमारास समर्थ पेट्रोलपंप, हिंजवडी येथे घडला.
फिर्यादी प्रेमकुमार गुलाब वाघमारे (वय ४१ वर्षे, नोकरी, रा. म्हाळुंगे) यांनी आरोपी शैलेश रघुनाथ बोडके (वय ३२ वर्षे, रा. ओझरकरवाडी, मु.पो. रिहे, ता. मुळशी जि. पुणे) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.