न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- लोखंडी तलवारीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. तसेच तलवार जवळ बाळगली. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली.
पोलिसांनी (दि. १९) रोजी दुपारी १.१५ वा.चे सुमारास महात्मा फुलेनगर, कमानी जवळ, एमआयडीसी भोसरी येथे कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपये किंमतीची तलवार जप्त केली.
चेतन महिंद्र मनोहर (वय १९ वर्षे, रा. महात्मा फुले नगर, मशिदीजवळ, एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विधीसंघर्षीत बालक सिध्देश सम्राट शिगे (वय १७, रा. फुलेनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.