न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- एकाच परिसरात राहत असल्याने फिर्यादी व आरोपीची पत्नी हे एकमेकांना तोंड ओळखीने ओळखतात. याचा फायदा घेऊन आरोपीने घाणेरडया नजरेने फिर्यादी महिलेकडे पहिले. मोबाईल नंबरवरून फिर्यादीच्या व्हॉटस अॅपवर मनास लज्जा उत्पन्न होईल असे घाणेरडे मेसेज पाठवले. फिर्यादीचा पाठलाग केला. फिर्यादीकडे घाणेरड्या नजरेने पहिले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १६ ते २०) दरम्यान साईनगर, मामुर्डी येथे घडली.
३२ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी दिपक ढवळे (संपुर्ण नाव माहित नाही, वय ३२ वर्ष. रा. सर्वे नं १४, राउतनगर, गणपती मंदिरजवळ, साईनगर, मामुर्डी) याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.