न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी द्या, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
पार्थ पवार हे मावळमधून लढल्यास लढत एकतर्फी होईल. शिवाय, पार्थ पवार हे समर्थ उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
मावळ लोकसभा मतदरासंघाच्या अंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि कर्जत लोकसभा मतदारंसघात शेतकरी कामगार पक्षाची प्रभावी ताकद आहे. त्यामुळे शेकपच्या पाठिंब्याला मोठं महत्व आहे.











