न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- भारतातील लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून, लोकसभा निवडणूकीचा मतदान कार्यक्रम आज रविवार (दि. १०) रोजी मुख्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.
त्यामुळे देशभरातील सर्व सरकारी कार्यालयातील घटनात्मक पदावरील पदाधिकाऱ्यांना आपली वाहने सरकार दप्तरी जमा करावी लागतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींना वापरासाठी दिलेली शासकीय वाहने त्यांनी सरकार दप्तरी जमा केली आहेत.
आचारसंहिता लागू होताच महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी आपले सरकारी वाहन जमा केले, अन् दुचाकीवरुन घरी रवाना झाले.











