- अनैतिक संबंधातून मुलीचा जन्म; महिलेची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- विधवा व एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री केली. त्यांना लग्नाचे आश्वासन दिले. फिर्यादीसोबत कंपनीच्या ऑफिसमध्ये, कारमध्ये, फिर्यादीचे राहत्या घरी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून एका मुलीचा जन्म झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार नोव्हेंबर २०१८ पासून ते आजपर्यंत सी/ओ चव्हाण, विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी आणि हायटेक मॅग्नेटीक जे ६६, जें ब्लॉक, एम.आय. डी. सी. भोसरी येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी मुर्गेशन गिरीराज पिल्लाई श्रीधर (वय ५४ वर्षे, रा. वुडस व्हिला सोसायटी, मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपी विरोधात भादवि कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












