- सोसायटी सेक्रेटरीसह इतरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- सोसायटीतील भांडणाच्या वादातून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीच्या कानशीलात मारली. तसेच अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सहआरोपी ४ याने फिर्यादीच्या हाताला धरून ढकलुन दिल्याने फिर्यादीच्या उजव्या कानाला इजा झालेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि ३०-०१-२०२३) रोजी रात्री ८.३० वा. ते ८.४५ वा. चे दरम्यान मेघना सोसायटी, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी सतीश कदम, सतीश कदम यांची पत्नी, सतीश कदम यांची मुलगी, सतीश कदमच्या घरी आलेला अनोळखी पाहुणा, सेक्रेटरी मोरे, सेक्रेटरी मोरे यांची पत्नी, सेक्रेटरी मोरे यांचा भाऊ व फ्लॅट नं. ४ मध्ये राहणारी महिला यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीसांकडून आरोपीविरोधात भादवी कलम ३५४,३२३, ५०४, ५०६, ४२७, १४३, १४७, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












