न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- पथनाटयाच्या सादरीकरणाचे टायमिंग व प्लॅनिंगवरुन फिर्यादीला आरोपींनी शिवीगाळ करुन धमकी दिली. तसेच आरोपीने तेथील मेगा फोन फिर्यादीच्या डोक्यात घातला. तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाठीवर मारुन त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. ३१/०१/२०२३) रोजी सकाळी ११.३० वा. चे सुमा, जायका चहा, भिमनगर, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी देवानंद बाळासाहेब शिंदे (वय ३१ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. स्वप्नगंध अपार्टमेंट, फलॅट नंबर ५०६, रायकर मळा, धायरी) यांनी आरोपी उमेश मिजार व अनिकेत राजे शिर्के यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेऊन सीआरपीसी ४१ (१) अ प्रमाणे नोटीस देत भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












