न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- कुरुळीतील शिवदीप लॉजमध्ये आरोपींनी पैशाचे अमिष दाखवुन पीडित सहा मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत केले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजिवीका भागवित असल्याची माहिती चाकण (महाळुंगे) पोलिसांच्या अनैतिक व्यापार (प्रतिबंध) पथकाला मिळाली. पथकाने लॉजमध्ये शरीरसुखाची मागणी करण्यासाठी डमी गिर्हाईकाला पाठविले.
(दि. ३०/०१/२०२३) रोजी सायं ७:३० वा चे सुमारास शिवदिप लॉजमध्ये अचानक कारवाई करीत आरोपीना रंगेहाथ पकडले. सहा पीडित मुलींची सुटका केली. दिपक जाधव (लॉज चालक) पुर्ण नाव पत्ता माहीत नाही, गौतम गणपत वाघमारे, (वय २४ वर्ष, रा-मोझे हायस्कुलजवळ, साई मंदिर शेजारी, दिघी, मुळगाव, रेल्वे हॉस्पिटल शेजारी, भुसावळ, ता भुसावळ, जि जळगाव), ऋषिकेश युवराज कदम (वय २२ वर्ष, राधावडेवस्ती, भोसरी, मुळगाव पाटोदा, जि बीड), इसराईल अब्दुला पठाण (वय २४ वर्ष, राहणार अमननगर, गांधीनगर शेजारी, बेळगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
यापैकी दिपक जाधव याने लॉजमधुन सी.सी.टी.व्ही. कॅमेरा डि. व्ही. आर. काढून पळ काढला आहे. आरोपींवर भा.द.वि. कलम ३७०, २०१, ३४, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलमी ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












