न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हातून २४ महिन्यांसाठी आरोपीला हद्दपार करण्यात आले होते. पोलिसांच्या आदेशाचा भंग करुन आरोपी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये आला. याबाबतची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यांनी चक्रपाणी वसाहतमधील पवार कार डेकोर दुकानासमोरील रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ५०,००० रुपये किंमतीचे देशी बनावाटीचे पिस्टल मॅगझीनसह व २०,००० रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण ७०,००० रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटिल (वय ३१ वर्षे, रा. मधली फुगे आळी, भोसरी गावठाण, वक्रतुंड इमारत, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी आरोपी विरोधात १०२/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १४२, ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












