न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकामार्फत प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरणा-यांवर कारवाई सुरु केली आहे. आज मंगळवार (दि. १२) रोजी झालेल्या कारवाईत ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ४० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.
यात ‘अ’ प्रभागातून ५००० रुपये, ‘ब’ प्रभाग २५०००, ‘क’ प्रभागातून २० हजार रुपये आणि ‘फ’ प्रभागातील प्लॅस्टिक वापरणा-यांकडून १५००० असा ६५ हजार रुपये दंड आज वसूल करण्यात आला आहे, त्यामुळे प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरणाऱ्यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन डॉ. रॉय यांनी केले आहे.















