न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च) :- ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा’ च्या अध्यक्षपदी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांची राज्य सरकारने नुकतीच नियुक्ती केली आहे.
‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कंपनी कायदा अधिनियम, १९५६ (१) च्या तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभागाअंतर्गत (दि. ११ जुलै १९८५) रोजी अस्तित्वात आले आहे. महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या विकासासाठी निधी दिला जातो. तसेच मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. या महामंडळाचे सुमारे ३०० कोटींचे बजेट आहे.
अमित गोरखे हे नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे संस्थापक अध्यक्ष असून, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे. त्यांची महामंडळावर अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, हे अध्यक्षपद राज्यमंत्री दर्जाचे आहे. गोरखे यांच्या रूपाने तरून तडफदार व सुशिक्षित व तज्ञ व्यक्तीची या पदासाठी निवड होणे हे समाजाच्या दृष्टीने हितकारक आहे.
मातंग समाजाची प्रगती करण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहे. समाजातील तरुणांना शिक्षणासाठी मदत केली जाईल. या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर काम करण्याची संधी मिळणार आहे. आजपर्यंत महामंडळाला उच्चशिक्षित अध्यक्ष लाभला नव्हता. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ मातंग समाजातील तळागाळातील लोकांना होत नव्हता. मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत विश्वासाने मला अध्यक्षपद दिले आहे. त्या पदाला १०० टक्के न्याय देणार आहे. आजपर्यंतचा अनुभवपणाला लावून पारदर्शक आणि स्वच्छ काम करण्यावर भर दिला जाईल, अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षाचे मनापासून आभार मानतो.
– अमित गोरखे











