न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च) :- चिंचवडगावातील इंडियन ओव्हरसीज बँकेला आज सायंकाळी ७:३० च्या सुमारास अचानक आग लागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत.
बँकेला आतून आग लागली असल्याची माहिती आजू-बाजुच्या दुकानातील लोकांनी आग्निशामक दलाला दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील आग्निशामक दलाचे दोन बंब तत्काळ रवाना झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. वायरच्या सोर्ट-सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.











