न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महामंडळांच्या रखडलेल्या नियुक्त्या अखेर जाहीर केल्या आहेत. कालच भाजपने अण्णाभाऊ साठे महामंडळावर भाजपचे अमित गोरखे यांची अध्यक्षपदी वर्णी लावली आहे. तर आज शिवसेनेच्या वतीने गटनेते राहुल कलाटे यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल कलाटे हे मागील चिंचवड विधानसभचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तसेच २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ते शिवसेनेचे नगरसेवक व आता महापालिकेत शिवसेनेचे गटनेते आहेत. शिवसेनेने राहुल कलाटे यांच्या रूपाने तरुण युवा नेतृत्वास या पदावर संधी देऊन तरुण कार्यकर्त्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.











