न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- मुले क्रिकेट खेळत असताना फिर्यादी साक्षीदाराला ‘मला १ बॉल खेळु दे’ असे म्हणाले. आरोपी ‘मी तुला खेळु देणार नाही, आम्ही पैशावरती मॅच लावली आहे’ असे फिर्यादीला म्हणाला. त्यावर फिर्यादी ‘ तुझा, माझा काही संबंध नाही, मी कवटया याचेशी बोलत आहे’ असे आरोपीला म्हणाले. त्याचा राग मनात धरून आरोपीने सहआरोपी २ ते ४ यांना फोन करुन बोलावुन घेतले. आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करुन फिर्यादीच्या उजव्या पायाच्या पंज्यावर दगड मारला. सह आरोपी २ याने फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी कोयता उलट्या बाजुने मारुन दुखापत केली. इतर आरोपीनी फिर्यादीला हाताने व लाथ मारली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १०) रोजी सायंकाळी ५.०० वाजता मिलींदनगर, पिंपरी येथील तथागत हौसींग सोसायटीच्या इमारतीजवळ घडली.
फिर्यादी सलमान दिलावर शेख (वय २७ वर्षे, शिक्षण ७ वी, धंदा, भाजीपाला दुकान रा. सम्राट सोसायटी एच बिल्डींग रुम नंबर २०, मिलींदनगर, पिंपरी) यांनी आरोपी निखील कसबे (वय अंदाजे १८ वर्षे, रा. मिलींदनगर, पिंपरी), सनी धावरे (वय अंदाजे १९ वर्षे), त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी १७९/२०२३ भा. द. वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६,३४ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) नुसार (दि. ११) गुन्हा दाखल केला आहे.
















