न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- भोसरी गुळवे वस्तीतील नमो स्टील ट्रेडींग या दुकानाचे लोखंडी शटर उचकटुन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात ठेवलेला २,१५,००० रुपये किमतीचे स्टील, कॉपर व ब्रासचे रॉड, बुश व प्लेटचा मुददेमाल व सीसीटीव्हीचा डिव्हीआर घरफोडी करुन चोरी करुन नेला आहे.
हा प्रकार (दि. ८) रोजी रात्री ८ ते (दि. १०) सकाळी १०:०० वाजेच्या दरम्यान शॉप नं. ५, सामराज्य इंडस्ट्रीज, बाजीराव लांडे इस्टेट, टागोर स्कूलजवळ घडला.
फिर्यादी महेंद्र कालीदास कांकरीया (वय ३९ वर्ष, धंदा ट्रेडींग, रा. ३४४/३, भवानी को हौ. सोसा, प्लॅ.नं. ८, भवानी पेठ, टिंबर मार्केट) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी (दि. ११) रोजी १३७/२०२३ भादवि कलम ४५७, ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















