न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- लांडेवाडीतील राजमाता कॉलेजवळील दत्त मंदीराचा दरवाजा कुलुप लावून बंद असताना अज्ञात इसमाने मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन मंदीरामध्ये प्रवेश केला.
मंदिरातील दानपेटी उचकटवुन दत्त जयंतीला जमा झालेली अंदाजे ३०,००० रुपयांची रोख रक्कम चोरी करून नेली आहे. हा प्रकार (दि. १०) रोजी रात्री ८.०० ते (दि. ११) रोजी घडला.
फिर्यादी प्रल्हाद तुकाराम पासलकर (वय ५५ वर्षे, धंदा-व्यवसाय, रा. लक्ष्मणनिवास, आदीनाथनगर, हिंदी प्राथमिक विदयालयाजवळ, भोसरी) यांनी आरोपी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी (दि. ११) रोजी १३८/२०२३ भा द वि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















